ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

माध्यमांची विक्री पूर्ण

भारतीय माध्यमांविषयी आधीच ज्ञात असलेल्या बाबींवर शिक्कामोर्तब करण्याचं काम कोब्रापोस्टच्या स्टिंग ऑपरेशननं केलं आहे.

भारतातील मुख्य प्रवाहातील माध्यमं पेचप्रसंगात अडकलेली आहेत. फक्त ते मान्य करायची त्यांची तयारी नाही. अलीकडच्या ‘कोब्रापोस्ट’ संकेतस्थळानं उघडकीस आणलेल्या प्रकरणांसारख्या घटना घडल्या की त्या संधीचा वापर करून आत्मचिंतन करण्याऐवजी प्रमुख माध्यमसमूह आत्ममग्न दृष्टिकोन अंगिकारतात.

शोधपत्रकारिता करणाऱ्या ‘कोब्रापोस्ट’ या संकेतस्थळानं त्यांच्या ‘ऑपरेशन १३६’ मालिकेचा दुसरा भाग २५ मे रोजी सार्वजनिक अवकाशात प्रदर्शित केला. माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकातील भारताच्या जागतिक क्रमवारीचा निर्देश ‘१३६’ या संख्येनं करण्यात आला होता (आता २०० देशांच्या या यादीत भारताचा क्रमांक आणखी खाली जाऊन १३८वर आला आहे). कोब्रापोस्टनं छुप्या कॅमेऱ्याद्वारे १७ माध्यमसमूहांबाबत केलेलं ‘स्टींग ऑपरेशन’ पहिल्या भागात समाविष्ट केलेलं होतं. श्रीमद् भगवद्गीता प्रचार समिती नावाच्या (बनावट) संघटनेमधून आपण आलो आहोत, असं भासवत ‘आचार्य अटल’ हे नाव धारण करणारा कोब्रापोस्टचा वार्ताहर या माध्यमसमूहांच्या विपणन व जाहिरातविषयक अधिकाऱ्यांना/कर्मचाऱ्यांना भेटला. धार्मिक संदेशांद्वारे सौम्य हिंदुत्वाचा प्रसार करणं, त्यानंतर विरोधी नेत्यांबाबत टीकास्पद व उपहासात्मक संदेश पसरवणं आणि त्यानंतर संघ परिवारातील नेत्यांद्वारे तीव्र धृवीकरण करणारे हिंदुत्ववादी संदेश देणं- अशा आशयनिर्मितीकरिता या माध्यमांना प्रचंड पैसा देण्याचा प्रस्ताव त्यानं ठेवला. प्रत्यक्षात कोणत्याही करारावर स्वाक्षऱ्या झाल्या नाहीत, पण अशा स्वरूपाच्या चर्चेत सहभागी व्हायला माध्यमसमूहांचे प्रतिनिधी इच्छुक होते, ही वस्तुस्थितीच पुरेशी भयंकर आहे.

Dear Reader,

To continue reading, become a subscriber.

Explore our attractive subscription offers.

Click here

Back to Top